स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी थाळीसाठी निल डायनिंग हॉल…

पुण्यातील पूर्व भागाला जसा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसेच खाद्य संस्कृतीची परंपरादेखील येथे जोपासली जात आहे. पुणेरी शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद सर्व सामान्यांना सहज घेता यावा या विचारातून प्रेरित होऊन 11 डिसेंबर 2017 रोजी सोमवार पेठेतील बरके आळीत अक्षय अरुण बरके यांनी निल डायनिंग हॉलची सुरुवात केली.

चोखंदळ पुणेकरांसाठी केवळ एकाच पद्धतीची थाळी न ठेवता मराठी, गुजराथी, राजस्थानी, पंजाबी खाद्यपदार्थांची चव मिळावी या हेतूने येथील थाळीची रचना करण्यात आली आहे. दर गुरुवारी महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूची भाजी, मसाले भात, मटकी उसळ, जिलेबी-मठ्ठा सोबत फरसाण म्हणून कोथिंबीर वडी, बटाटे वडे, दहीवडा यांची मेजवानी असते. तर रविवारी खास राजस्थानी पद्धतीची दाल बाटी, चुरमा, गट्ट्याची भाजी, दालखिचडी या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. स्वीटसह पोटभर जेवून तृप्ततेचा ढेकर द्यायला लावणारी ही परिपूर्ण थाळी म्हणजे ग्राहकांचा मिळविलेला विश्‍वास. येथील अगदी गरमा गरम फुलक्‍यांपासून इतर सगळे खाद्यपदार्थ शुद्ध गावरान तेला-तुपातील असून शुद्धता व स्वच्छता येथे कटाक्षाने पाळली जाते. येथे पार्सल थाळीची सुविधा उपलब्ध असून पार्टीच्या ऑर्डरदेखील स्वीकारल्या जातात.

निल डायनिंग हॉलची वेळ रोज सकाळी 11.00 ते दुपारी 3.45 व सायंकाळी 7.00 ते रात्री 10.45 पर्यंत असून, बुधवारी मात्र दुपारनंतर डायनिंग हॉल बंद असतो. खवैय्यांना कंटाळा न यावा म्हणून (सतत बदलता मेनू) हे त्यांचे वैशिष्ट्य. आपुलकीचे आदरातिथ्य, सेवकवर्गाचा विनम्रपणा आणि स्वतः जातीनं लक्ष देऊन आग्रह करणारे अक्षय बरके यामुळे फार थोड्या काळात निल डायनिंग हॉल नावारूपाला आला आहे.

संपर्क – 9422313620/9767308277/9422313040.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup:
13 :heart:
1 :joy:
13 :heart_eyes:
12 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)