स्वाती सेमवालची देखील ‘मणिकर्णिका’मधून एक्‍झिट 

गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला ‘मणिकर्णिका’ चित्रपट चर्चेत राहिला. चित्रपटाला दिग्दर्शक क्रिश पाठोपाठच सोनू सूदने रामराम ठोकला. संपूर्ण चित्रपट कंगनाच्या अहंकारामुळे उद्‌वस्त होत असल्याचे सांगत या चित्रपटाला सोनूने रामराम ठोकला होता. आता चित्रपटातून आणखी एका अभिनेत्रीने एक्‍झिट घेतली आहे. गांधी जयंतीदिवशी ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. पण अभिनेत्री स्वाती सेमवाल हिने ऐनवेळी या चित्रपटातून अंग काढून घेतले आहे.
स्वातीने स्वतः एका माध्यामाशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. सोनू सूदने चित्रपट सोडल्यानंतर माझ्या भूमिकेला किती महत्त्व असणार आहे हे मला माहिती नव्हते. मी हा चित्रपट सोडण्याबाबत गोंधळलेली होते. पण माझ्या टीमशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय मी घेतला असल्याचे तिने म्हटले आहे. सोनू सूद या चित्रपटात सदाशिव भाऊ यांची व्यक्तीरेखा साकारणार होता. पण कंगनाने दिग्दर्शनाची जबाबदारी चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात स्वतःकडे घेतल्याने आणि दिग्दर्शक क्रिशच्या चित्रपटातील एक्‍झिटमुळे सोनूनेही चित्रपटाला रामराम ठोकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)