नवी दिल्ली – आयुष्मान योजनेची घोषणा आज ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येत्या २५ सप्टेंबरपर्यंत पंडित दीनदयाळ यांच्या जयंती दिनी ‘पंतप्रधान जन आरोग्य योजना’ सुरु होणार असून  याअंतर्गत १० कोटी कुटुंबाना ५ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना चांगल्या व कमी दरात मेडिकल सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर देशवासियांना संबोधित करताना केली.

शेतमालाला दीडपट हमीभावविषयी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले कि, शेतीत आधुनिक बदल घडवणे आमचे लक्ष्य असून २०२२ पर्यंत शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते पुढे म्हणाले, स्वच्छ भारत अभियानाची अनेक जणांनी खिल्ली उडवली. मात्र जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) अहवालानुसार, स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचा जीव वाचला आहे, असेही त्यांनी सांगितले.

संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक असून सर्व नागरिकांना न्याय मिळावा तसेच त्यांचा विकासाचा अधिकार संविधानाने दिला आहे. स्वांतंत्र्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनवाटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करेल. मानवाला अंतराळात पाठविणारा भारता हा जगात चौथा देश बनेल, अशी आशाही व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)