स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य प्रेरणादायी!

  • सुहास पडवळ : चापेकर स्मारक समितीतर्फे कार्यक्रम

पिंपरी – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत ऍड. सुहास पडवळ यांनी व्यक्‍त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतीतीर्थ चापेकर वाड्यात स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी पडवळ बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रविंद्र नामदे, संजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष अशोक पारखी, गतीराम भोईर, आसाराम कसबे, शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, सुनंदा दंडवते, अश्विनी बावीस्कर, शिक्षक सुनिता घोडे, विजय पारधी, पंडित गायकवाड, अतुल आडे आदी उपस्थित होते.
पडवळ म्हणाले की, चापेकरांच्या बलीदांनातूनच सावरकरांनी प्रेरणा घेतली व पुढे क्रांतीची ज्योत तेवत ठेवली. सावरकरांनी देश भक्ति व राष्ट्र निष्ठा यातून अनेक काव्य व ग्रंथ रचना केल्या त्या भारतीय समाजाला आजही प्रेरणादायी ठरत आहेत.

-Ads-

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा आढावा मुख्याध्यापक नटराज यांनी घेतला.या प्रसंगी सतीश गोरडे म्हणाले हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे सावरकर हे पहिले पुढारी होत.देशभक्ती केली म्हणून त्यांची बी.ए ची पदवी काढून घेण्यात आली. बॅरिस्टर होउनही त्यांना इंग्रजांनी सनद दिली नाही. जन्मठेपेच्या दोन शिक्षा त्यांना सुनवण्यात आल्या. प्रकाशना पूर्वी त्यांचे दोन ग्रंथ जप्त करण्यात आले. अंदमानात भिंतीवर काटयाने आणि खिळ्याने महाकाव्य रचणारे एकमेव महा कवि अशा भावना गोरडे यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केले. आभार सहकार्यवाह रवींद्र नामदे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)