कोपरगांव – भारतीय स्वातंत्रप्राप्तीत विनायक दामोदर सावरकर यांचे सर्वात मोठे योगदान असून त्यांच्या 135 व्या जयंतीदिनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख आजही आठवला तर अंगावर शहारे निर्माण होतात असे प्रतिपादन कोपरगांव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शरद थोरात यांनी केले.
कोपरगांव शहर व तालुका भाजपाच्या वतींने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमीत्त प्रतिमेस अभिवादन करण्यांत आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पराग संधान, बाळासाहेब नरोडे, शिवसेनेचे कैलास जाधव, शहराध्यक्ष कैलास खैरे, सुषांत खैरे, गोपी गायकवाड, वैभव गिरमे, विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पन्नास वर्ष काळया पाण्यांची शिक्षा सावरकरांनी भोगली परंतु ब्रिटीशांसमोर ते कधीही झुकले नाही. अतिशय कमी वयात सावरकरांनी स्वातंत्र मिळविण्यांसाठी ध्येय ठेऊन काम केले. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचा आलेख तरूणाईने अभ्यासला पाहिजे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)