स्वातंत्र्यदिनी मावळात तिरंग्याला मानवंदना

वडगाव मावळ -देशभक्तीपर गीते, प्रभातफेरी, खाऊवाटप, मदरशाबरोबरच शासकीय कार्यालये व संस्थांच्या कार्यालयाच्या वतीने ध्वजारोहन करत मावळ तालुक्‍यात मोठ्या उत्साही वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पावसाच्या कोसळत्या सरी अंगावर झेलत अनेक ठिकाणी ध्वजारोहन करत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. तर विविध ठिकाणी आयोजित केलेल्या प्रभातफेरींमधून होणारा महापुरुष व देशाच्या विजयाचा उद्‌घोषाने देशभक्‍तीच्या वातावरण हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लोणावळ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
लोणावळा शहरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिना निमित्त शहरातील विविध भागात शासकीय कार्यालये, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, पक्षीय कार्यालये तसेच शाळा- कॉलेज मध्ये धजारोहन करत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे यांच्या हस्ते तर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पोली निरिक्षक बी.आर. पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. या प्रसंगी लोणावळा ग्रामीणचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक रामदास इंगवले, सहाय्क पोलीस निरिक्षक वैभव स्वामी, रानगट, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश शितोळेव कर्मचारी उपस्थित होते. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणीही प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
लोणावळा नगरपरिषदेच्या इमारतीच्या आवारात यंदा प्रथमच नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आजी माजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नगरपरिषद रुग्णालयात उत्कृष्ट काम केलेल्या परिचारिकांना कै. भाऊसाहेब साळवेकर पारितोषिक तर नगरपरिषद प्राथमिक शाळेत उत्कृष्ट काम केलेल्या शिक्षकांना कै. विमलादेवी रामसिंग सिसोदिया पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय लोणावळा महाविद्यालयात लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार उपस्थित होते. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमधूनही मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

विवेकानंद स्कुलमध्ये देशभक्तीपर गीते
तळेगाव दाभाडे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
रोटरी क्‍लब तळेगाव एमआयडीसीचे नूतन अध्यक्ष शंकरगौडा हदिमनी यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकीय तंत्रज्ञान अवगत करून देशास महासत्ता बनविण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केले. यावेळी संस्थचे उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सहसचिव सुहास गरुड, खजिनदार सुदाम दाभाडे, संचालक विलास काळोखे, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

कामशेतमध्ये विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण, प्रभातफेरी
पंडित नेहरू विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना दहावीतील यशवंत विध्यार्थ्यांचे कौतुक करत दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी ऐश्‍वर्या खराडे हिच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी स्काऊट ध्वजारोहन विद्यालयाचे प्राचार्य नागेश माहुले यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या ठेवीच्या रकमेतून आलेल्या व्याजामधून दहावी व बारावीतील गुणवंत असणार्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कामशेतच्या सरपंच सारिका घोलप, उपसरपंच नितीन गायखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळी, पालक व शिक्षक शाळेत उपस्थित होते .
जैन इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहन ज्येष्ठ पालक हेमा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य, समूहगीते, देशभक्तीपर गीते असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे विभागीय पोलीस उपाअधीक्षक ज्ञानेश्‍वर शिवथरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कामशेत पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक नीलकंठ जगताप ; तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सारिका घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. नाणे मावळातील कांबरे येथे सरपंच नथु गायकवाड, करंजगावच्या गोल्डन ग्लेड्‌स माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक शिवाजीराव टाकवे, प्राथमिक शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष एकनाथ पेठकर, ग्रामपंचायतमध्ये सरपंच मालन साबळे , गोवित्री येथे संगीता सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गोवित्रीच्या अजित मोरे गुरुजींनी विद्यार्थ्यांना घेऊन सामाजिक प्रबोधनसाठी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली होती. गोल्डन ग्लेड्‌स माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रम ओबेरॉय यांनी पात्रतेला जबाबदारीची जोड दिली तर देशाच्या प्रगतीचा आलेख नेहमीच उंचावत जाईल, असे मत व्यक्त केले.

मळवलीतील मदरसा, ग्रामपंचापतीमध्ये ध्वजारोहन
मळवली भाजे येथील दारुल अरकम मदरसा मध्ये बाबारभाई शेख यांच्या हस्ते ध्वाजरोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कारी खलील अहमद, मौलाना जमाल कौसर, मौलना अख्तर, शाकीर सय्यद, रिझवान खान यांच्यासह मदरसामधील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्ला ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरंपच अश्‍विनी हुलावळे यांनी तर तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहन मंडल अधिकारी मानिक साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेचे रुपाली हुलावळे, एकविरा विद्यालयाचे प्रदिप हुलावळे, वेहरगाव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरंपच दत्तात्रय पडवळ,दहिवली उपसरपंच सचिन येवले,वेहरगाव जिल्हापरिषेद शाळेत पोलिस पाटील अनिल पडवळ, मळवली ग्रामपंचायतचे उपसरपंच कोयना शेडगे, तलाठी कार्यालयचे पोलीस पाटील शहाजान इनामदार तर प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्या जमुना पटेकर यांनी व शिलाटणा ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरंपच ज्ञानदेव भानुसघरे, जिल्हा परिषेद शाळेचे लायन्स क्‍लबचे अविनाश गांधी यांनी, भाजे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरंपच चेतन मानकर, भाजे प्राथमिक शाळेत उपसरपंच सुनिता दळवी, देवले येथे सरंपच महेंद्र आंबेकर, प्राथमिक शाळेत शारदा आंबेकर, पाटण ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक शंकर तिकोणे, हिरामण खंडू तिकोणे तर शाळेमध्ये प्रभारी सरंपच सुनंदा तिकोणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

कल्हाटमध्ये ई-लर्निंग संच भेट
कल्हाट ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन सरपंच बिजाताई जाचक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी करवंदेवाडी शाळेला ई-लर्निंग संच भेट देण्यात आला. या संचाचे उद्‌घाटन सरपंच बिजाताई संतोष जाचक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला उपसरपंच रूपालीताई करवंदे, सदस्य जावेद मुलाणी सदस्य कविताताई पवार, प्रणाली अगिवले, सुभाष पवार तसेच सर्व ग्रामस्त व शिक्षक उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)