स्वातंत्र्यदिनी दिल्लीत घातपात करण्याचा कट उघड

आठ हातबॉम्बसह दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याच्या प्रयत्नातील एका दहशतवाद्याला पोलिसांनी जम्मूमध्ये अटक केली आहे. त्याच्याकडून 8 हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हे बॉम्ब घेऊन तो दहशतवादी दिल्लीला निघाला होता. तेथील हस्तकांना हे बॉम्ब देणार होता, असे जम्मूचे पोलिस महानिरीक्षक एस.डी.एस. जमवाल यांनी पत्रकारांना सांगितले.

-Ads-

रविवारी संध्याकाळी जम्मूतील गांधी नगर भागातून इरफान हुसैन वाणी याला अटक करण्यात आली असून तो दक्षिण काश्‍मीरमधील डांगेरपुरा अवंतीपुरा भागातील रहिवासी आहे. त्याच्याकडून रोख 60 हजार रुपये देखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

इरफानकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याच्या अन्य हस्तकांचीही माहिती मिळाली आहे. झाकीर मुसाच्या नेतृत्वाखालील अन्सर गझवत उल हिंद या संघटनेशी तो संबंधित आहे. तसेच त्या संघटनेतील क्रमांक दोनचा म्होरक्‍या रेहान याच्याही तो संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. जम्मूतील छत्री पॉईंटजवळ संशयास्पदरितीने वावरत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

लष्कर ए तोयबा, जैश ए मोहंम्मद आणि हिझ्बुल मुजाहिदीनसारख्या अन्य काश्‍मिरी दहशतवाद्यांकडून स्वातंत्र्यदिनी समारंभामध्ये घातपाती कारवाया केल्या जाण्याचा इशारा मिळाल्यापासून सुरक्षा दलांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इरफान हुसैन वाणीची अटक हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)