राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर; राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके

– सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, सारंग आवाड, श्रीकांत पाठक यांचा समावेश

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देण्यात येणारे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना यंदा पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात पुण्याचे पोलीस सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) पोलीस अधिक्षक सारंग आवाड, राज्य राखीव दलाच्या दौंड येथील गटाचे कमांडर श्रीकांत पाठक, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहीते कोथरूड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिगंबर जाखडे यांचा समावेश आहे.

पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील पोलिसांना 8 शौर्य पदके, 3 राष्ट्रपती पोलीस पदके आणि 40 पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील 942 पोलीस अधिकारी अणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांची नुकतीच पुण्याच्या सहपोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. बोडखे यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांचा समावेश आहे.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागातील पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या दौंड येथील गटाचे कमांडर श्रीकांत पाठक यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहीते, कोथरूड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिगंबर जाखडे, गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार चंद्रकांत इंगळे, बिनतारी संदेश विभागातील उपनिरीक्षक किशोर अत्रे यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. सहपोलीस आयुक्त बोडखे यांनी चंद्रपूर येथे नक्षलविरोधी मोहीम राबविण्यात उल्लेखनीय काम केले आहे. लातूर येथे कार्यरत असताना त्यांनी भुकंपग्रस्तांचे पुनर्वसन, मदत तसेच कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली होती. बोडखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारगांव सुद्रीक गावचे रहिवासी आहेत. ते 1984 मध्ये पोलीस दलात रूजू झाले होते.

सारंग आवाड 1996 मध्ये पोलीस उपअधिक्षक म्हणून सांगलीतील इस्लामपूर येथे रूजू झाले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागात ते अधिक्षक होते, तसेच पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणून काम करताना आवाड यांनी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणे तसेच वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी उपक्रम राबविले होते. श्रीकांत पाठक हे पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेत उपायुक्त होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)