मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथे स्वातंत्र्य दिन उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कळंब परिसरातील एकलहरे, शिंदेवाडी,लौकी, चांडोली, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्त करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी, बारावीमध्ये तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, तसेच शाळेसाठी देणगी व शालोपयोगी वस्तू देणाऱ्या दानशूर दात्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी गावातून शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो… अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. शाळेच्या पटांगणावर सरपंच राजश्री भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक यशवंत कानडे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष डी. आर. भालेराव, तुकाराम कानडे, बाबुराव कानडे, ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे, आशिष ऊर्फ मुन्ना कानडे, अमित भालेराव, उद्योजक नितीन भालेराव, शशिकांत भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)