स्वाईन फ्ल्यूवरील मोफत लस घेण्याचे आवाहन

पिंपरी – शहरातील स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात ही लस उपलब्ध असून रुग्णांना त्वरीत घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

गेली दोन महिन्यांपासून शहरात स्वाईन फ्ल’ूच्या आजाराचा फैलाव वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस झपाट्याने वाढत आहे. शहरात एक जानेवारीपासून अद्यापपर्यत 11 रूग्णांचा मूत्यू झाला असून, 73 रुग्ण बाधित आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायययोजना म्हणून गरोदर माता, लहान बालके, अतिजोखमीचे रुग्ण, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या सर्व रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लस विनामूल्य उपलब्ध करण्यात आलेली आहे.

ही लस रुग्णांना त्वरीत देण्याची गरज आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात ही प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. सध्या, PANVAX, VACCIGRIP, INFULUVAC ही लस बाजारात उपलब्ध करण्यात आलेली असून वर्षातून एकदा टोचून घेण्याची गरज आहे. या लसीमुळे स्वाईन फ्लू सारख्या जीवघेण्या आजारावर प्रतिबंध घालण्यास निश्‍चितपणे मदत होईल,’ अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)