स्वाईन फ्लू सदृश आजाराने विवाहितेचा मृत्यू

संगमनेर – तालुक्‍यातील मनोली येथील विवाहित महिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मृत्यू झाला. तालुक्‍यातील स्वाईन फ्लूने घेतलेला हा आठवा बळी ठरला आहे.
ही महिला गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आजारी होती. त्यांच्यावर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तालुक्‍यात अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याने या आजाराच्या बाबतीत आरोग्य विभाग अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)