स्वाईन फ्लू सदृश्‍य आजाराने एकाचा बळी

वडूज – येथे मागील आठवड्यात स्वाईन फ्लू सदृश्‍य आजाराने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी आणखी एकाचा स्वाईन फ्लूसदृश्‍य आजाराने बळी गेला.

याबाबत माहिती अशी, उत्तम साहेबराव गोडसे (वय 49) हे गेल्या आठवड्याभरापासून ताप, खोकला, आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ, भावजय असा परिवार असून त्यांच्या कुटूंबातील आणखी दोघे जण आजारी असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वडूज नगरपंचायतीतर्फे स्वाईन फ्लू आजाराबाबत घरोघरी पत्रके वाटून सोशल मीडिया मार्फत जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे खरबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रत्येक गटारांवर टॉमी फॉस पावडर फावरण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावीत. त्याचप्रमाणे या आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयामध्ये दाखल व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा शोभा माळी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)