“स्वाईन फ्लू’ बाधितांसाठी “आयसोलेशन वॉर्ड’ चा अभाव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लू बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असूनही या रुग्णांसाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात “आयसोलेशन वॉर्ड’ तयार करण्यात आला नाही. या रुग्णांना सामान्य रुग्णांबरोबर ठेवले जात असल्याने स्वाईन फ्लूचा फैलाव होण्याची भिती आहे.

शहरातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव वाढल्याचे दिसत आहे. याची शहरवासियांनी धास्ती घेतल्याचे दिसते. हा संसर्गजन्य आजार असल्याने इतरांना लागण होण्याची शक्‍यता असते. यामुळे महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात “आयसोलेशन वॉर्ड’ तयार करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

“आयसोलेशन वॉर्ड’ ची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे. परंतु, या मागणीला आरोग्य विभागाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे इतर रुग्णांबरोबरच याठिकाणी येणाऱ्या नातेवाईकांनाही स्वाईन फ्लूची बाधा होण्याचा धोका आहे. “आयसोलेशन वॉर्ड’ तयार केल्यास “स्वाईन फ्लू’ च्या रुग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णांवरील उपचाराला गती देणे आरोग्य विभागाला शक्‍य होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.
शनिवार दि. 8 अखेर शहरातील बाधितांची संख्या 102 असून 3 रुग्ण कृत्रीम श्‍वासोच्छवासावर आहेत. जानेवारीपासून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. बाधित तसेच मृत्युमुखींची संख्या पाहता महापालिकेने उपाय-योजना करण्याची गरज आहे.

वायसीएममध्ये जागेअभावी “आयसोलेशन वॉर्ड’ तयार करण्यात आला नाही. या रुग्णालयात 750 खाटा आहेत. पुणे शहरातील ससून रुग्णालयातही “आयसोलेशन वॉर्ड’ नाही. रुग्णांची संख्या अधिक झाल्याने हा वॉर्ड तयार करण्यात आला नाही.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्‍त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)