स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस खरेदी करणार आहे. दीड हजार बॉटल्ससाठी 3 लाख 88 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

शहरात जानेवारी 2018 पासून स्वाईन फ्लूचे सहा बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी एक रुग्ण दगावला. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी शासनाकडून लस व औषधांचा पुरवठा होतो. मात्र महापालिकेचा 2018-19 वर्षाचा साठा संपला आहे.

स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीची बाब म्हणून एक महिन्यांसाठी स्वाईन फ्लू लस खरेदीचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी (दि. 14) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे लस खरेदीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)