स्वाईन फ्लू टाळण्यासाठी सतर्क रहा

नेवासा – स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नयेयासाठी तालुक्‍यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. युध्दपातळीवर काम करावे, असेआवाहन पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांनी केले.

पंचायत समितीमध्येस्वाईन फ्लूबाबत आयोजित कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. उपसभापती राजनंदिनी मंडलिक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सहायक अधिकारी अनंत परदेशी, भैय्यासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा साळवे, रावसाहेब कांगुणेयावेळी उपस्थित होते.

तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र कसबेम्हणाले, तालुक्‍यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घरभेटीद्वारे स्वाईन फ्लूविषयी जनजागृती अभियान राबवलेजात आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी नागरिकांनी संपर्क साधावा.

सभापती सुनीता गडाख म्हणाल्या, स्वाईन फ्लूसारख्या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सतर्कता दाखवावी. युध्द पातळीवर आरोग्य विभागाने काम करणे गरजेचे आहे. या काळात कोणीही आपापले मुख्यालय सोडू नये. घरभेटीवर भर देऊन प्रबोधन व जनजागृती करावी. यासाठी मासिक बैठकीचे आयोजन करून अहवाल सादर करावा, त्यासाठी यंत्रणा राबवावी. आरोग्य कमिटी तयार करावी. यामध्येगाफिल न राहता सतर्कता बाळगावी. डेंजर झोनची माहिती घेऊन उपाय योजना करावी.

नेवासा प्राथमिक आरोग्य केंद्राचेवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश कांगुणे, डॉ. परमेश्‍वर घोळवे, आरोग्य सेवक संजय चेमटेयांनी आरोग्य उपाययोजनेविषयी मार्गदर्शन केले. डॉ. चैताली भोंडवे, डॉ. संतोष थोरात, डॉ. दीपक डींबर, डॉ. सुरवसे, डॉ.विजय मनोरे, डॉ. दिनेश जाधव यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)