स्वाईन फ्लू आणखी एक रुग्ण उपचारासाठी दाखल

शहरात भीतीचे वातावरण : दोन रुग्ण अत्यावस्थ
पुणे, दि.8 – स्वाईन फ्लूबाबत सध्या शहरात भीतीचे वातावरण पसरले असून मंगळवारनंतर आता लगेच बुधवारीही स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
शहरात एच-वन एन-वनचे आतापर्यंत 20 रुग्ण आढळले आहेत. या वर्षात कोणताही रुग्ण दगावल्याचे वृत्त नाही. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यात चारहून अधिक रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस वेगाने पसरत असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सध्या चार रुग्ण याबाबत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील दोन रुग्ण हे अत्यावस्थ आहेत. दरम्यान, याबाबत विचारणा करण्यासाठी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)