स्वाईन फ्लूमुळे 43 वर्षीय इसमाचा मृत्यू

पिंपरी – काळेवाडी येथील 43 वर्षीय इसमाचा स्वाईन फ्लूने सोमवारी मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत स्वाईन फ्लूचा हा तिसरा बळी आहे. या रुग्णाला 14 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने 15 ऑगस्टला त्याला कृत्रिम श्‍वासोच्छावासावर ठेवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवार दि. 20 ला रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात विविध रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेले सात रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 74 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यातील 63 रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात आले आहेत.

शहरातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या पाहता महापालिका 3 लाख 22 हजार रुपये किंमतीची लस खरेदी करणार आहे व टॅमी फ्लूच्या 10 हजार गोळ्या खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका सभेसमोर ठेवण्यात आला आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच त्वरित डॉक्‍टरांशी संपर्क साधा व गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला मास्क लावून जा, पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा, संत्री,लिंबू सारख्या फळांचा आहारातील सेवन वाढवा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)