“स्वाईन फ्लू’मुळे आणखी दोघांचा मृत्यू

पिंपरी – स्वाईन फ्लू’ च्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी दोन रुग्णांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हे रुग्ण गेल्या चार दिवसांपासून कृत्रिम श्‍वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
स्वाईन फ्लू’ च्या आजाराने बुधवार (दि. 5) दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, सहा रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. जानेवारीपासून अद्यापपर्यत 13 जणांचा मृत्यू झाला असून 79 रुग्णांना स्वाईन फ्लू’ची बाधा झालेली आहे. याचबरोबर, 19 रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकजण बुलढाणा जिल्ह्यातील तर दुसरा मंचर तालुक्‍यातील माण गावचे आहेत. गेल्या तीन महन्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा जीवघेणा आजार लवकरात-लवकर आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिकेने रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसही मोफत दिली आहे. तसेच, या आजाराबाबत महापालिकेचे डॉक्‍टर दक्ष असल्याची माहिती, आरोग्य विभागाने दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)