“स्वाईन फ्लू’ने 12 जण बाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वाईन फ्लू’च्या बाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या आजाराने शनिवार (दि. 29) आणि रविवार (दि. 30) बारा बाधित रुग्ण आढळले असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, जानेवारीपासून अद्यापपर्यंत 201 बाधित रुग्ण आढळले असून पन्नास रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत. या भयावह आजाराला रोखण्यात महापालिकेला अपयश येताना दिसत आहे.

शहरात गेल्या चार दिवसापासून वातावरणात बदल होत आहेत. ढगाळ वातावरण, दुपारपर्यत कडक ऊन तर सायंकाळी पाऊस पडत आहे. या वातावरणातील बदलामुळे “स्वाईन फ्लू’चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे, या आजारातील मृतांची संख्या, बाधित व संशयित रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. यंदाच्या वर्षी “स्वाईन फ्लू’ने जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर अचानक या आजाराचा फैलाव वाढला. या आजाराने अद्यापपर्यत 27 रुग्ण दगावले आहेत. “स्वाईन फ्लू’ बरोबर डेंग्यू, मलेरिया या आजारांचेही बाधित रुग्ण आढळत आहेत.

वातावरणातील बदलामुळे “स्वाईन फ्लू’चा आजार फैलावलेला आहे. “स्वाईन फ्लू’ आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका उपाययोजना करत असून नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. महापालिकेतर्फे शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर व महापालिका रुग्णालयातील डॉक्‍टर यांची एकत्रित कार्यशाळांचेही आयोजन केले जात असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)