स्वाईन फ्लूने तिघांचा मृत्यू?

11 जण व्हेंटिलेटरवर : जानेवारीपासून रुग्णांची संख्या 36 वर

पुणे – शहरात स्वाईन फ्लूच्या तीन संशयित महिलांचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक बाब आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे या तीनही महिला आहेत. तर सध्या स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.

-Ads-

गेल्या चार ते पाच दिवसांत 11 ते 12 रुग्ण आढळून आले आहे. “एच वन-एन वन’ची लागण झालेले रुग्ण इतक्‍या वेगाने सापडत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, रुग्णांना अन्यही रोगाची लक्षणे आढळल्याने मृत्यूचे नेमके कारण शोधल्यानंतरच स्वाईन फ्लू मृत्यांचा निश्‍चित आकडा सांगितला जाईल, असे असेही आरोग्य विभागाने सांगितले.

मृत्यू झालेल्या तिघींपैकी एक महिला उस्मानाबाद येथील आहे. 36 वर्षीय महिलेचा 3 ऑगस्टला शहरातील पुणे स्टेशनजवळील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तिला सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचे 22 जुलै रोजी सांगण्यात आले होते. त्यानंतर पुण्यात दाखल केले असता उपचारादरम्यान स्वाईन फ्लूसह न्यूमोनिया, सेप्टीसेमिया आणि विविध अवयव निकामी झाल्याने रात्री एक वाजता मृत्यू झाला.

दुसऱ्या केसमध्ये मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेचा मृत्यू 19 ऑगस्टला सकाळी खासगी रुग्णालयात झाला. तिला स्वाईन फ्लू असल्याचे निदान 18 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. दरम्यान, आधीपासून तिला मधुमेह, उच्च रक्तदाब होता. तसेच तिचे हृदय शस्त्रक्रियाही झाली होती. तीव्र श्‍वसनविकार, स्वाईन फलू, न्यूमोनिया आणि विविध अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

तिसऱ्या प्रकरणात हडपसर येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू 21 ऑगस्ट रोजी एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात झाला. या महिलेला पूर्वीचा कोणताही आजार नव्हता. तसेच 14 ऑगस्ट रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले होते. स्वाईन फ्लूसह तीव्र श्‍वसनविकार, न्युमोनिया, सेप्सिस यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे
ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी, नाक वाहणे आणि श्‍वास घेताना त्रास होणे. अतिसार व उलट्या होणे, दोन दिवसांहून अधिक काळ ताप असणे, शुद्ध हरपणे किंवा धाप लागणे आदी स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. यापैकी काही लक्षण आढळल्यास घरगुती उपाय न करत बसता त्त्वरीत डॉक्‍टरांकडे जाऊन तपासणी करा तसेच 48 तासाच्या आत टॅमी फ्लू घ्या, असे आवाहन डॉ.साबणे यांनी केले आहे.

ते मृत्यू हे संशयित आहेत. ते स्वाईन फ्लूचेच आहेत, की नाही हे मंगळवारच्या बैठकीनंतरच सांगण्यात येईल. दरम्यान, पाच हजार कॉड्रिव्हेलेंट व्हॅक्‍सिनची मागणी शासनाला केली असून पालिकाही एक दीड हजार व्हॅक्‍सिन खरेदी करणार आहे. तसेच स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास 48 तासांच्या आत जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन तपासणी करावी व टॅमी फ्लू घ्यावी.
– डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)