‘स्वाईन फ्लू’ने चिखलीतील महिलेचा मृत्यू

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. या आजाराने बुधवारी (दि. 10) चिखली येथील एका महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

जानेवारीपासून अद्यापपर्यत “स्वाईन फ्लू’ने 32 रुग्ण दगावले आहेत. शहरात “स्वाईन फ्लू’ने कहर केला आहे. या आजाराने रुग्ण दगावण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. बुधवारी (दि. 10) चिखली येथील मोरेवस्ती परिसरातील 33 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णावर गेल्या पाच दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच, “स्वाईन फ्लू’चे शहरात अद्यापपर्यंत 229 बाधित रुग्ण आढळले असून 60 रुग्णांना कृत्रिम श्‍वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)