“स्वाईन फ्लू’ने एकाचा मृत्यू

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वाईन फ्लू’ने मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा दिवसें-दिवस वाढत आहे. गुरुवारी (दि. 4) एका रुग्णाचा मृत्यू झाला असून तीन बाधित रुग्ण आढळलेले आहेत.

शहरात “स्वाईन फ्लू’ने जानेवारीपासून अद्यापपर्यत 29 रुग्ण दगावले आहेत. “स्वाईन फ्लू’ने मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवार (दि. 4) बोपखेल येथील 44 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या रुग्णावर आठवडाभरापासून शहरातील खासगी रुणालयात उपचार सुरु होते. तसेच, जानेवारीपासून अद्यापपर्यत 216 बाधित रुग्ण असून 53 रुग्ण कृत्रिम श्‍वासोच्छवासावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)