“स्वाईन फ्लू’ने एकाचा मृत्यू

– बाधितांची संख्या 87 वर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वाईन फ्लू’ने एका रुग्णाचा गुरुवारी (दि. 6) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, “स्वाईन फ्लू’चे आठ बाधित रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या 87 वर पोहचली आहे.

रहाटणी येथील 39 वर्षीय पुरुषाला “स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्याने सोमवारपासून महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आजाराचा त्रास वाढल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छासावर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले होते. गुरुवारी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरात “स्वाईन फ्लू’ने जानेवारीपासून अद्यापपर्यत 14 जणांचा बळी घेतला आहे. बाधित रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. “स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्‍टरांचा वेळीच सल्ला घेणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील बदलत्या वातावरणामुळे “स्वाईन फ्लू’चे विषाणू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)