पिंपरी – “स्वाईन फ्लू’ने बाधित रुग्ण वाढत असताना या आजाराच्या प्रतिबंधक लसीचा तुटवडा गेल्या तीन दिवसांपासून जाणवत आहे.

या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना या लसीचा तुडवडा पडत असून महापालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे. “स्वाईन फ्लू’ लस शहरातील महापालिकेच्या वायसीएम, जिजामाता आणि तालेरा या रुग्णालयात उपलब्ध नाही. शहरातील “स्वाईन फ्लू’च्या बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना लसीची कमतरता जाणवणे हे महापालिका प्रशासनाचे अपयश आहे.

एखादा चिंताजनक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यास डॉक्‍टर कशा पध्दतीने उपचार करणार, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाच हजार लस खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. परंतु, ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्यास किमान एक महिन्याचा कालावधी जाण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)