स्वाईन फ्लूचे सात रुग्ण अत्यावस्थ

दोन दिवसांत सात रुग्ण सापडले : रुग्णांची संख्या 31 वर
पुणे- शहरात गेल्या दोन दिवसांत स्वाईन फ्लूचे सात रुग्ण आढळून आले असून यंदा रुग्ण संख्या 31 वर पोहोचली आहे. तर, सध्या बारा रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत असून त्यापैकी 7 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी 4; तर 21 ऑगस्ट रोजी 3 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 31 रुग्णांमधील 17 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात स्वाईन फ्लूने एकही रुग्ण दगावल्याचे वृत्त नाही. दरम्यान, एनवन-एचवनची आतापर्यंत शहरात 5 लाख 56 हजार 811 जणांची तपासणी करण्यात आली असून 5 हजार 218 जणांना टॅमी फ्लू देण्यात आली आहे. तर, 790 जणांची तपासणी सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)