स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रुग्ण खासगी रुग्णालयात आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू सारखा जीवघेणा आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्‍यता आहे.

शहरातील खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची परिस्थिती धोक्‍याच्या बाहेर असून त्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. वर्षभरात सहा रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळले. यामधील, एका रुग्णाचा जानेवारी महिन्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

“”शहरातील वेदांत रुग्णालयामध्ये एक रुग्ण व आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण स्वाईन फ्लूची लागण झाल्याने दाखल झाले आहेत. या रुग्णांची परिस्थिती चिंताजनक नसल्याने त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच, महापलिकेतर्फे प्रत्येक रुग्णांची तपासणी सुरु आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखीचा त्रास सुरु झाल्यास रुग्णांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी,” असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वाईन फ्लू विभागाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)