स्वाईन फ्लू’चे तीन महिन्यांत आठ रुग्ण

पाच रुग्णांवर उपचार पूर्ण, दोन अत्यवस्थ तर एकाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
पुणे – “स्वाईन फ्लू’ विषयी नागरिकांमध्ये एकेकाळी असणारी भीती आता नाहिशी झाली असली तरीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड मिळून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत आठ रुग्णांना “स्वाईन फ्लू’ची लागण झाली आहे. यामध्ये पाच रुग्णांना उपचारांती घरी सोडले आहे; तर दोन रुग्ण अत्यवस्थेत आहेत. तसेच, एकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे यामध्ये पुणे शहरातील सात व पिंपरी-चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या स्वाईन फ्लूचे 415 संशयित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत जानेवारीपासून आतापर्यंत 2 लाख 26 हजार 89 रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यापैकी 4 हजार 530 रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या; तर विविध रुग्णालयांत 360 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांत मिळून 4 हजार 617 रुग्णांना “टॅमी फ्लू’ देण्यात आल्या आहेत, तर 446 रुग्ण संशयित आहेत. मात्र, आतापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड वगळता यावर्षी सोलापूर व सातारामध्ये “स्वाईन फ्लू’ची एकही केस दाखल झालेली नाही.

वातावरणातील बदलाचा “स्वाईन फ्लू’वर परिणाम
स्वाईन फ्लूचे जंतू हे तापमानातील बदलानुसार कमी जास्त होत असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. ज्या वर्षात दिवसातील कमाल व किमान तापमान तीनवेळा बदलते त्यावर्षी “स्वाईन फ्लू’चे प्रमाण अधिक आढळते. मागील वर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण खूप जास्त होते. यंदा ही आकडेवारी तुलनेने कमी दिसते.

आरोग्य विभागाकडून काय काळजी?
ज्या भागांत “स्वाईन फ्लू’चा रुग्ण आढळतो, त्या भागांत राहणाऱ्या आसपासच्या जवळपास पन्नास घरांतील लोकांना “टॅमी फ्लू’ देण्यात येते. तसेच, ती व्यक्‍ती ज्या ज्या ठिकाणी जाते तेथील व्यक्‍तींची लक्षणे आढळल्यास त्त्वरीत तपासणी होत असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील स्वाईन फ्लूची आकडेवारी
वर्ष           लागण         मृत्यू
2009       2417       149
2010       2837       282
2011           23           1
2012         912         60
2013         345         64
2014           46         15
2015        1754      252
2016            35        13
2017        1144       230


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)