पिंपरी- “स्वाईन फ्लू’ची दोघांना बाधा

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. मागील चार दिवसात शहरात दोन बाधित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

शहरात “स्वाईन फ्लू’ने जुलै ते सप्टेंबर महिन्यात कहर केला होता. या दरम्यान “स्वाईन फ्लू’ने शहरात 33 रुग्णांचा बळी गेला होता. पावसाळ्यात शहरातील अनेक नागरिकांना या आजाराची लागण झालेली होती. यानंतर, ऑक्‍टोबर महिन्यापासून “स्वाईन फ्लू’ आटोक्‍यात आला होता. मात्र, पुणे व पिंपरी शहरात या आजारांने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

वर्षभरात थैमान घातलेला “स्वाईन फ्लू’ मागील तीन महिन्यापासून आटोक्‍यात आला होता. परंतु, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला “स्वाईन फ्लू’चे रुग्ण आढळले होते. या नंतर मागील चार दिवसात पुन्हा बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

“स्वाईन फ्लू’ व इतर आजारांची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात उपचार सुरु करावेत. तसेच, शहरातील महापालिकांच्या रुग्णालयात “स्वाईन फ्लू’ आटोक्‍यात येण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)