“स्वाईन फ्लू’ची आणखी चार जणांना बाधा

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’च्या रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी शहरात चार बाधित रुग्ण आढळल्याने जानेवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या अठ्ठावीस झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात “स्वाईन फ्लू’चे दोन संशयित रुग्ण आढळले होते. नंतर, त्या रुग्णांचा तपासणी अहवाल “निगेटीव्ह’ आल्याने त्यांना “डिस्चार्ज’ देण्यात आला. जानेवारी महिन्यापासून “स्वाईन फ्लू’ने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

यातील तीन दिवसांपूर्वी काळेवाडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने एक जानेवारीपासून अद्यापर्यत चार हजारहून अधिक रुग्णांना “टॅमी फ्लू’च्या गोळ्या दिल्या आहेत. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयांना दक्ष राहण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
– पिण्याचे पाणी उकळून प्यावे
– गरोदर महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे
– खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाला धरावा
– गरम पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)