स्वाईनच्या साथीने औषध विक्रेतेही धास्तावले

सातारा – सध्या जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीने थैमान घातले आहे. अठरा ते वीस जणांना स्वाईनने आत्तापर्यंत बळी घेतला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे स्वाईन फ्ल्यूच्या साथीच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असून मेडिकल विक्रेतेही स्वाईनच्या साथीने चांगलेच धास्तावले आहेत. शहरातील मेडिकल दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारीही खरबदारी म्हणून तोंडावर मास्क लावत असल्याचे चित्र शहरातील सर्वच मेडिकल दुकानांमध्ये दिसत आहे.

गत महिनाभरापासून जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या साथीचा फैलाव झाला आहे. सुरुवातीला गांभीर्याने ने घेतलेल्या या साथीने जिल्ह्यातील अठरा ते वीस जणांचा बळी घेतला आहे. याशिवाय जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लागण झालेली रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून या स्वाईन बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वाईनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली असून गावागावातून स्वाईनविषयी जनजागृती सुरु आहे.

-Ads-

तसेच स्वाईन फ्ल्यू होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कापूर आणि वेलचीची पुड आपल्या रुमालात बाळगण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. तसेच टॅमी फ्ल्यूच्या गोळी देखील उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दरम्यान, शहरातील औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये कामाला असलेले कर्मचारीही स्वाईन फ्ल्युमुळे धास्तावले आहेत. सकाळी घरातून निघाल्यापासून ते पुन्हा घरी जाईपर्यंत हे कर्मचारी तोंडावर मास्क लावत आहेत. शहरातील बऱ्यापैकी सर्वच औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही परिस्थिती पहावयास मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)