स्वाइन फ्लू रोखण्यासाठी तातडीने उपाय व्हावेत

वाढत्या साथीनंतर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचे निर्देश

आठवड्यातून एकदा आढावा घ्या : आयुक्‍तांना सूचना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदल म्हणून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहे. सर्वेक्षण वाढवावे, सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे 24 तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांचा या संदर्भात आठवड्यातून आढावा घ्यावा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले.

स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी पुणे येथे भेट दिली. साथरोग संदर्भातील आढावा बैठक घेऊन प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑगस्टमध्ये राज्यात आणि पुणे शहर व ग्रामीण विभागात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यावेळी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये स्वाइन फ्लूरोधक औषधांचा आढावा घेण्यात आला. 2018 साठी ट्रायव्हॅलेंट लस वापरणे योग्य असल्याबाबतचा निर्वाळा राष्ट्रीय विषाणू अनुसंधान अर्थात “एनआयव्ही’मधील तज्ज्ञांनी दिला असून “ऑसेलटॅमिविर’ सोबतच “झानामीवीर’ औषधदेखील उपलब्ध असण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाला सांगावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा खासगी रुग्णालयांची बैठक घ्यावी, असे निर्देश यावेळी डॉ. सावंत यांनी दिले.

राज्यात सव्वा लाख जणांना लसीकरण
राज्यात जून अखेरपर्यंत 1 लाख 28 हजार अतिजोखमीच्या व्यक्तींना स्वाइन फ्लूचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या फ्लू सर्वेक्षण अधिक सक्षम करुन सर्व संशयित रुग्णांना त्यांच्या आजारांच्या वर्गीकरणानुसार दोन दिवसांच्या आत उपचार सुरू होणे आवश्‍यक आहे, अशीही चर्चा यावेळी बैठकीत झाली.

आणखी पाच रुग्ण सापडले
शहर परिसरात मंगळवारी झालेल्या तपासणीत स्वाइन फ्लूचे आणखी पाच रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. आता एकूण रुग्णांची संख्या 46 झाली असून त्यापैकी 19 रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)