स्वाइन फ्लूचे आणखी 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर

File Photo

डेंग्यूचेही थैमान : 174 संशयितांना टॅमी फ्लू सुरू

पुणे – शहरात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत असताना, दररोज तीन ते चार नवीन रुग्ण आढळून येत आहे. त्यात आता व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 50 वर पोहचली आहे. गुरूवारी (दि. 4) दिवसभरात 5 हजार 68 व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 174 संशयितांना टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आले आहे. तर तीन रूग्ण स्वाइन फ्लूचे आढळून आले.

सध्या शहरातील विविध रूग्णालयात एकूण 50 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मागील चार महिन्यांपासून डेंग्यूने शहरात थैमान घातले असून, सप्टेंबर महिन्यापासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढल्यामुळे शहराचे एकूणच आरोग्य खराब होत चालले आहे.

स्वाइन फ्लूसह डेंग्यू आणि चिकनगुणिया या आजाराने शहरासह जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. मागील दोन महिन्यात स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध पथके स्थापन करण्यात आले असून, स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांच्या राहत्या परिसरात पाहणी करून आवश्‍यक ती उपाययोजना केली जात आहे. तसेच संशयितांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत 287 स्वाइन फ्लूचे रूग्ण आढळून आले असून, काहींना उपचार देऊन घरी सोडण्यात आले. 50 रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

रूग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काही रुग्णालयांमध्ये गर्दी झाली आहे. परंतू, प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळावे यासाठी महापालिका आणि डॉक्‍टरांकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंगी आणि चिकुनगुणियाचे रुग्णही आढळून येत आहे. आज दिवसभरात 7 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, मागील आठ दिवसांत तब्बल 55 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर 8 रुग्णांना चिकनगुणिया झाल्याचे निदर्शनास आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)