स्वाइन फ्लूचे आणखी 5 संशयित आढळले

पुणे – शहरात मागील दहा महिन्यांत 554 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यामध्ये काही जणांना प्राणही गमवावे लागले आहे. रविवारी (दि.28) दिवसभरात केवळ तपासणी केलेल्या रुग्णांपैकी पाच स्वाइन फ्लू सदृश्‍य रुग्ण आढळून आले. त्यांना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव काहीसा कमी झाला आहे. दररोज 20 ते 25 रुग्ण स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून लागण होण्याचे प्रमाण कमी झाले असून, शनिवारी (दि. 27) 15 रुग्ण सापडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी झालेल्या तपासणीमध्ये स्वाइन फ्लूची लागण झालेला रुग्ण आढळून आला नाही. असे असले, तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल किंवा मास्क लावूनच बाहेर पडावे. सर्दी, घसा दुखणे, खोकला आणि ताप ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दरम्यान, अतिदक्षता विभागात 21 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 60च्या वर होती. ती आता 19 वर आली आहे. त्यावरून प्रादूर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दोन महिन्यांत 8 व्यक्‍तींचा मृत्यू झाला असून, 94 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)