स्वाइन फ्लूचे आणखी पाच रुग्ण

खासगी डॉक्‍टर्स्र शिक्षकांनी घेतले जनजागृतीचे धडे

पुणे – शहरात स्वाइन फ्लूचे शुक्रवारी आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात स्वाइन फ्लूग्रस्तांची संख्या 57 वर पोहचली आहे. यापार्श्‍वभूमीवर आता पालिकेनेही खासगी डॉक्‍टर्स व शिक्षकांमध्ये जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच गुरूवापासून पालिकेने शहरातील शाळांच्या शिक्षकांची बैठक घेतली. गणेश कला क्रीडा मंच व घोले रोड सांस्कृतिक भवन येथे झालेल्या सभेत शिक्षकांना स्वाइन फ्लूबाबत माहिती देण्यात आल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी अंजली साबणे यांनी सांगितले.

साबणे म्हणाल्या, “शिक्षकांबरोबरच खासगी डॉक्‍टरांनाही स्वाइन फ्लूच्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉल समजावण्यात आला. तसेच रुग्णाला टॅमी फ्लू कधी सुरू करावी, कधी त्यांच्या तपासण्या केल्या जाव्यात, कश्‍या पद्धतीने त्यांची तपासणी व्हावी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आमच्याकडून दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्लू बाबत काय करावे व काय करू नये, याबाबत जनजागृतीपर पत्रकेही वाटण्यात आली आहेत.’

आणखी तिघे दगावल्याची शक्‍यता
पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, स्वाइन फ्लूचे शहरात आतापर्यंत 57 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 24 जणांना उपचारांती सोडण्यात आले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण हे विविध रुग्णालयात अजूनही उपचार घेत आहेत. मात्र, अन्य तिघांचे काय झाले, याची माहिती पालिकेने दिली नाही. त्यामुळेच यांचा मृत्यू झाला आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. पालिकेकडून दगावलेल्या व्यक्‍तीच्या मृत्यूचे नेमके कारण कळाल्याशिवाय त्या व्यक्‍तीची माहिती जाहीर केली जात नाही. या वर्षातील स्वाइन फ्लूचा पहिला मृत्यू 3 ऑगस्ट रोजी झाला, मात्र पालिकेने ही माहिती 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली. त्यामुळेच या तीन रुग्णांबाबत नेमके काय झाले आहे, ते कळलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)