स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती

थंडीचा जोर वाढल्याने साथीचे आजार बळावले

पुणे – शहरात थंडीचा जोर वाढल्यामुळे सर्दी, ताप, खोकला या साथीच्या आजारांच्या समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत, घराबाहेर पडताना नाका-तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडावे. सर्दी, ताप, खोकला किंवा घसा खवखवणे अशी लक्षणे आढळून आल्यास डॉक्‍टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरासह जिल्ह्यात थंडीच्या कडाक्‍याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहेत. त्यामुळे त्वचेच्या समस्यांबरोबरच सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंग दुखणे, संधीवात ही लक्षणे असलेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच डेंग्यू आणि मलेरियाने शहराला विळखा घातलेलाच आहे. अशा परिस्थितीत मागील दोन दिवसांत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्यामुळे महिनाभरापासून गायब झालेला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.11) दिवसभरात तीन हजार व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एका व्यक्तीचा लागण झाल्याचे समोर आले. तर 52 संशयितांना टॅमीफ्लूची औषधे देऊन विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)