स्वस्त धान्य दुकानदारांचा रविवारपासून बेमुदत संप

पिंपरी – स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन तुटपुंजे आहे. त्यामुळे त्यांचा सरकारी सेवेत समाविष्ठ करावा, या मागणीसाठी 1 एप्रिलपासून स्वस्त धान्य दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 220 स्वस्त धान्य दुकानदार यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशन व ऑल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. फेडरेशनचे अध्यक्ष गजाजन बाबर व महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी नुकतीच बैठक घेऊन संपाचा निर्णय घेतला. मुंबई आझाद मैदान येथे 1 लाख दुकानदारांच्या उपस्थितीत हा संप करण्याचा निर्धार आहे.

शासनाने ई-पॉस मशिन दिली आहे; मात्र त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन कमी मिळत आहे. त्यांना परवडत नाही. त्यामुळे दुकानदारांना सरकारी सेवेत समाविष्ठ करून घ्यावे, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. दरम्यान राज्य सरकारने दमदाटीने सचिवामार्फत डीएसओ, तहसिलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी यांना शासनामार्फत परिपद्धक काढून दुकानदारांना मोर्चात येऊ नये यासाठी दडपण आणल्याचा आरोप संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. या संपाला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)