स्वस्त घरांची संख्या 60 लाखांवर

पंतप्रधान गृहनिर्माण योजनेंतर्गत शहरी क्षेत्रात सव्वासहा लाखांहून अधिक स्वस्त घरे बांधण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेत आतापर्यंत बांधकामाची परवानगी मिळालेल्या घरांची संख्या साठ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण तसेच नगरविकास मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार, केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या राज्यांसाठी प्रस्तावित स्वस्त घरांच्या योजनांमधील घरांच्या संख्येत वाढ करून ही संख्या 62 लाख 64 हजार 88 करण्यात आली असून, बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशसाठी 23 लाख 48 हजार 79 तर आंध्र प्रदेशसाठी 14 लाख 5 हजार 59 घरांना मंजुरी देण्यात आली आहे.

-Ads-

बैठकीत 11 राज्यांनी नव्या घरबांधणी योजनांसाठीचे प्रस्ताव सादर केले. योजनअंतर्गत आतापर्यंत 60 लाख 28 हजार 608 घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशसाठी 74 हजार 631, छत्तीसगडसाठी 30 हजार 371, बिहारसाठी 50 हजार 17, गुजरातसाठी 29 हजार 185 महाराष्ट्रासाठी 22 हजार 265 तर तमिळनाडूसाठी 20 हजार 794 घरांच्या बांधकामांना समितीने मंजुरी दिली आहे.

– स्वरदा वैद्य

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)