स्वराला होती कुमारी माता बनण्याची भीती

स्वरा भास्कर केवळ सिनेमामध्येच बोल्ड रोल करते असे नाही, तर वास्तविक आयुष्यातही ती तशीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. तिने वेळोवेळी दिलेल्या मुलाखतींमधून तिने आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली आहेत. तिच्या स्टेटमेंटवर कोणी काहीही प्रतिक्रिया देवोत, त्याच्याशी तिला काहीही देणे घेणे नसते. नुकतेच तिचा “वीरे दी वेडिंग’ रिलीज झाला आणि त्यातील तिच्या ऍक्‍टिंगचे खूप कौतुकही होते आहे. त्यात तिच्या तोंडी असलेल्या बिनधास्त डायलॉगची तर खूपच चर्चा सुरू आहे. विशेषतः “मास्ट्रुबेशन’ सारख्या अत्यंत खासगी विषयावरही उघडपणे चर्चा घडवण्याचे धाडस या सिनेमाने केले आहे. याशिवाय कास्टिंग काऊचबाबतही स्वराने आपली बिनधास्त भूमिका मांडली होती. स्वराने अलिकडेच असेच एक बिनधास्त आणि बोल्ड स्टेटमेंट केले आहे. त्याबाबत विचार केला, तर स्वरा इतकी बोल्ड ऍक्‍ट्रेस आपल्या बॉलिवूडमध्ये नाहीच, असे वाटेल.

लहान असताना आपल्याला “कुमारी माता’बनण्याची भीती वाटायला लागली होती, असे स्वराने म्हटले आहे. स्वराला अशी भीती का वाटत होती, असा प्रश्‍न सहाजिकच मनात येऊ शकतो. त्याचे कारण स्वराचा स्वभाव किंवा तिचा बिनधास्तपणा नसून त्या काळातील चित्रपट आहे. स्वरा लहान असताना रिलीज होणाऱ्या बहुतेक हिंदी सिनेमांमधील हिरोईन या कुमारी माता बनलेल्या दाखवल्या जात असत. सहाजिकच स्वराही स्वतःला हिरोईनप्रमाणे कुमारी माता बनण्याचा धोका असल्याचे मानू लागली होती. कुमारी माता बनण्यामागील बायोलॉजिकल आणि फिजीकल कारणे त्यावेळी तिला माहिती नव्हती. त्या कारणांचा नेमका अर्थ, सामाजिक आणि कौटुंबिक परिणामही तिला माहिती असण्याचे काही कारण नव्हते. तिच्या बालसुलभ मनामध्ये अशी भीती निर्माण होणे अस्वाभाविक नाही. आपण कुमारी माता बनल्यास काय होऊ शकेल, असा विचार ती लहान असताना करत होती. मात्र तिला उत्तर मात्र सापडत नव्हते. मात्र तिने ही भीती आता बोलून दाखवल्यामुळे तिच्याबाबत वेगळे तर्क लढवले जाऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)