स्वराज्याचा साक्षीदार दुर्लक्षित

ताथवडा किल्ल्याची केविलवाणी अवस्था

किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी

-Ads-

प्रकाश राजेघाटगे
बुध, दि. 2 – दख्खनच्या रणसंग्राहासाठी छातीचा कोट करणाऱ्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाची साथ देणारा ताथवडा (संतोषगड) किल्ल्याची अवस्था सध्या केविलवाणी झाली आहे. गडावर झालेल्या वास्तू, देवडी पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. छत्रपती शिवारायांच्या स्वराज्याचे वैभव असलेल्या किल्ल्याचे संवर्धन पुरातत्त्व विभागाने करावे, अशी मागणी इतिहासप्रेमी नागरिकांमधून होत आहे.

पुसेगाव-फलटण या मार्गाच्या मध्यावर ताथवडा (संतोषगड) किल्ला उभा आहे. संताषगडाच्या पायथ्याला दीड हजार लोकवस्ती आहे. गावात शंकर, बाळसिद्धनाथ, विठ्ठल आदी देवतांची कलापूर्ण मंदिरे आहेत. गडाच्या कुशीत विसावलेले ताथवडा गाव, पाठीमागे उंच गड व त्याही पाठीमागे कमी उंची असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसतात. गडावर जाणारा तृतीयांश प्रवास ठिसर व चढणीचा आहे. गडावर भुयारांमार्गात भरपूर पाण्याचा साठा आहे. आणखी बऱ्यापैकी भुयारे आहेत. कातळात खोदलेली विहीर आहे. बाजूला उध्दवस्त इमारती पात्रा, देवडी इत्यादी वास्तु पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. किल्लाची एकूण अवस्था पाहिल्यास त्याचा इतिहास इतर किल्यांच्या मानाने फार जुना असावा.
पुरंदरच्या तहानुसार छ. शिवराय, संभाजी व नेताजी पालकर मिर्झाराजेंसह विजापूराकडे फौजेसह रवाना झाले. मिर्झाराजांच्या सुचनेनुसार छ. शिवरायांनी नेताजीस फलटण जिंकून घ्यावयास लावले. डिसेंबर 1965 मध्ये नेताजीने ताथवडा गडावर स्वारी करून गड जिंकला. यानंतर नेताजीने विजापूरकरांचे खटाव ठाणे जिंकले. छत्रपतींच्या इतिहासाची अशी साक्ष देणारा हा किल्ला सध्या दुर्लक्षित आहे. किल्ल्यावर भुयारात पाण्याचा साठा व मोडकळीस आलेल्या वास्तू आहेत. त्यांचे जतन करण्याबाबत काहीच कार्यवाही झालेली दिसत नाही. पुरातत्त्व खात्याने किल्ल्याच्या संवर्धन करण्यासाठी आवश्‍यक त्या हालचाली करण्याची गरज आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनही याबाबत पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)