स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने “तोरणा’ किल्ल्याची साफसफाई 

नगर – नेवासा तालुक्‍यातील काही तरुण शिक्षक मित्रांनी सामाजिक भावना लोकांच्या मनात जागृत व्हावी, या उद्देशाने स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्‍यात असणारा अतिशय दुर्गम किल्ला तोरणा किल्ला निवडला व तोरणा किल्ल्याची साफसफाई करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
तोरणा किल्ला साफसफाई करण्याच्या मोहिमेत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राजेंद्र ठोकळ, नितीन दळवी, प्रकाश मुरकुटे, संदीप खाडे, सुभाष भांड, संदीप कवडे यांनी सहभाग घेतला.
नेवासा येथील तरुण शिक्षक मित्रांनी काहीतरी वेगळं कार्य करायचे व सामाजिक भावना लोकांच्या मनात जागृत करायची, या विचाराने प्रेरित होऊन व शिवरायांचे विचार व कार्य जनमानसापर्यंत पोहोचावे, अशा उद्देशाने स्वराज्यरक्षक नावाचे प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्‍यात असणारा अतिशय दुर्गम किल्ला तोरणा किल्ला निवडला व तोरणा किल्ल्याची साफसफाई करायचे ठरवले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी संपूर्ण गडाची साफसफाई केली व गडावर असणारा 50 ते 60 किलो प्लॅस्टिक कचरा जमा करून एक खोल खड्डा खोदून त्यात गाडून टाकला. प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे तो पर्यावरणाची खूप हानी करतो. गड व पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प या प्रतिष्ठानच्या तरुणांनी केला आहे. या कार्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)