स्वरांनंदवनचा आविष्कार पाहून नगरकर थक्क

नगर: सूर निरागस हो, सत्यम शिवम सुंदरम, मिले हो तुम हमको यासह दिव्यांग कलाकारांनी गायलेली विविध मराठी, हिंदी गाणी, बहारदार लावणी, घुमर, कठपुतली नृत्याच्या अप्रतिम कलाविष्काराने नगरकर रसिकांना मोहिनी घातली. निमित्त होते, युवानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. विकास बाबा आमटे दिग्दर्शित स्वरानंदवन या संगीत रजनीचे. नव्या दमासह कालसुसंगत बदल करत स्वरानंदवनने आपला 2001 वा प्रयोग यशस्वीपणे नगरमध्ये सादर केला.
सुरूवातीस महामानव बाबा आमटे यांच्या प्रतिमा पुजन आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी रोटरी क्‍लबच्या प्रांतपाल आशाताई फिरोदिया, रोटरी प्रियदर्शिनीच्या प्रतिभा धूत, रिटा झंवर, अशोक गांधी, हेमंत लोहगावकर, गोविंद जोशी, स्वरानंदवनचे व्यवस्थापक सदाशीव ताजणे, स्नेहालयचे डॉ.गिरीश कुलकर्णी, युवानचे सुरेश मैड, प्रसन्न बोरा आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात युवानचे संदिप कुसळकर यांनी युवानच्या मागील वर्षातील यशस्वी रचनात्मक कार्याचा थोडक्‍यात परिचय करून दिला. स्वरांनदवनचे रवी मुनगुंटीवार यांनी स्वरानंदवन ही दिव्यांगाना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाणारी उपचार पद्धती असल्याचे सांगितले. दान नको, संधी द्या हे ब्रीद घेऊन दिव्यांगामध्ये स्वरानंदवनने आत्मविश्‍वास निर्माण केल्याचे आवर्जून सांगितले. सुत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. तब्बल तास कार्यक्रम सादर करत स्वरानंदवनातील दिव्यांग कलाकारांनी नगरकरांची मने जिंकली. देशभक्तीपर गाण्यावर व्हिल चेअरच्या साथीने केलेल्या नृत्यास रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. जोडो भारत आणि भारत मातेच्या जयजयकाराने कार्यक्रमाचा समारोप झाला. यशस्वीतेसाठी बांगडीवाला ग्रो प्रॉडक्‍टस, जरिवाला, बॅक ऑफ महाराष्ट्र, माय टिफीन, हेमराज केटरर्स, बन्सी महाराज, आय लव्ह नगर, रेडिओ सीटी, गुरव साऊंडस्‌ यांचे सहकार्य लाभले. सुप्रिया मैड, महेश चव्हाण, गणेश शेटे, गोकुल क्षीरसागर, ऋषीकेश खिलारी, भाग्यश्री सूर्यवंशी आदी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)