स्वरांजली कलामंचद्वारे वामनदादा कर्डक यांना अभिवादन

भोसरी – स्वरांजली कलामंचद्वारे महाकवी वामनदादा कर्डक यांना जयंतीनिमित्त कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात विविध कार्यक्रमाव्दारे अभिवादन करण्यात आले.

नगरसेवक विकास डोळस आणि नगरसेविका सुलक्षणा शीलवंत-धर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. माजी नगरसेवक साहेबराव खरात अध्यक्षस्थानी होते. भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शीलवंत, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, उद्योजक भगवान सोनवणे, राजेंद्र डोळस, ज्येष्ठ कवी रमेश डोळस, दीपक डोळस आदी उपस्थित होते.

-Ads-

प्रबोधनकार प्रतापसिंग बोदडे, माधव जगताप, राजानंद गडपायले यांना कवी-गायक पुरस्कार तसेच कुणाल वराळे, संकल्प गोळे, सुवर्णा भवार, रोहिणी यशवंते आदींना उत्कृष्ट गायक, चित्रपट निर्माते संदीप राक्षे, अभिनेते संदीप साकोरे, अनिकेत सोनवणे, मनोज डोळस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संजना डोळस यांना सामाजिक कार्याबद्दल तर राजेश डेव्हिड यांना उत्कृष्ट मेलेडिस्ट व सॅमसन चंदनशिवे यांना उत्कृष्ट रिदमिष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साधना मेश्राम, राखी चौरे, अमर पुणेकर, चित्रसेन भवार, सुदेश कांबळे, रमेश भोसले, निशांत गायकवाड आदींनी भीम गीते सादर केली. प्रास्ताविक प्रकाश डोळस यांनी केले. सूत्रसंचालन संजय बेंडे व पूनम ओव्हाळ यांनी केले. बाबासाहेब साळवे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)