स्वरदा परब, अमन तेजाबवाला यांचा सनसनाटी विजय 

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 
पुणे – मुलींच्या गटात बिगर मानांकित स्वरदा परबने द्वितीय मानांकीत गार्गी पवारचा, तर मुलांच्या गटात बाराव्या मानांकित अमन तेजाबवालाने अव्वल मानांकित उदित गोगोईचा पराभव करताना एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज रवाईन हॉटेल 16 वर्षांखालील नॅशनल सिरीज टेनिस स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत सनसनाटी निकालाची नोंद केली. एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेने रवाईन हॉटेल यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील 16 वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित स्वरदा परबने द्वितीय मानांकित गार्गी पवारचा 6-1, 6-4 असा दोन सेटमध्ये पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित भक्‍ती शहाने पंधराव्या मानांकित श्रेया चक्रवर्तीचे आव्हान 7-6 (8), 6-2 असे टायब्रेकरमध्ये संपुष्टात आणले. तर पाचव्या मानांकित शरण्या गवारेने तृतीय मानांकित संजना सिरीमुल्लाचा 3-6, 6-4, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली.

मुलांच्या गटात बाराव्या मानांकित अमन तेजाबवालाने अव्वल मानांकित उदित गोगोईचा संघर्षपुर्ण लढतीत 7-6(4), 2-6, 6-3 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. चौथ्या मानांकीत क्रिश पटेलने सातव्या मानांकित आर्यन भाटियाचा 6-2, 6-4 असा पराभव करीत आगेकूच केली. तर तृतीय मानांकित दिवेश गेहलोतने नवव्या मानांकित हीरक वोराचा 6-3,7-5 असा पराभव करताना उपान्त्य फेरी गाठली. आणखी एका लढतीत द्वितीय मानांकित सुशांत दबसने सहाव्या मानांकित अर्णव पतंगेचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करताना उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-

सविस्तर निकाल – 
16 वर्षांखालील मुली – उपान्त्यपूर्व फेरी – भक्‍ती शहा (7) वि.वि. श्रेया चक्रवर्ती (15) 7-6 (8), 6-2, शरण्या गवारे (5) वि.वि. संजना सिरीमुल्ला (3) 3-6, 6-4, 6-0, विपाशा मेहरा वि.वि अदिती अरे 6-0, 6-3, स्वरदा परब वि.वि गार्गी पवार (2) 6-1, 6-4

16 वर्षांखालील मुले- उपान्त्यपूर्व फेरी – अमन तेजाबवाला (12) वि.वि. उदित गोगोई (1) 7-6 (4), 2-6, 6-3, क्रिश पटेल (4) वि.वि. आर्यन भाटिया (7) 6-2, 6-4, दिवेश गेहलोत (3) वि.वि. हीरक वोरा (9) 6-3,7-5, सुशांत दबस (2) वि.वि. अर्णव पतंगे (6) 6-2, 6-2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)