स्वरगंगा संगित विद्यालयाचा 100 टक्‍के निकाल

मंचर -मंचर येथील स्वरगंगा संगीत विद्यालयाचा निकाल 100 टक्‍के लागला असल्याची माहिती संगीत विशारद प्रा. गंगाराम तनपुरे यांनी दिली. गायन वादाच्या परीक्षेमध्ये आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील 135 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नोव्हेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या गायन वादनाच्या परीक्षेमध्ये आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यातील 135 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये प्राप्त केलेले विद्यार्थी संस्कार तपस्वी, आर्यन गाढवे, आयुष झुंजुरके, प्रतिक्षा मेहेर, यशराज आर्वीकर, ज्ञानेश्वरी पिंगळे, वेदांत गाढवे, हिमांशू चौधरी, सिद्धेश घोलप, मोनिका घोलप, प्रतीक चासकर, ओजस काशिद, शार्दुल डुंबरे, रिदम ओतूरकर, श्रवण शिंगोटे, स्तवन तनपुरे, श्रुती तनपुरे, विशाल अरगडे, मयुरी बोरसे, मनोज कारकूड, गार्गी काळे, अपेक्षा गिजरे, ओम पाटे, विक्रांत नाईक, दिव्याक्षी काळे, कौशल्य शेटे, मृणाल वाळूंज, श्रेया बोनवटे, रिद्धी लोहोट या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन जनता विद्यालय घोडेगाव या संस्थेचे अध्यक्ष अजित काळे, अध्यक्ष संजय आर्वीकर, प्राचार्य मेरी फ्लोरा डिसूजा व प्रा. गंगाराम तनपुरे, उपप्राचार्य रेखा आवारी यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)