स्वरगंगा भजनी मंडळ प्रथम

भोर- पसुरे (ता. भोर) येथील श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळातर्फे आयोजित भजन स्पर्धेत शिंद येथील स्वरगंगा भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
एक दिवसीय महिला भजन स्पर्धेत भोर तालुक्‍यातील एकूण 16 भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. तबला, पखवाज वादन, व ढोलकी यांच्या जुगलबंदीने कार्यक्रमाची रंगत वाढली होती. स्पर्धेचे पंच म्हणून किसन महाराज रवळेकर(मुंबई), पखवाज तबला विशारद गणेश महाराज कळंबे(मुंबई), यांनी काम पाहिले.दरम्यान, स्पर्धेचे उद्‌घाटन हभप विष्णू महाराज बांदल यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली होती. यावेळी श्री दुर्गामाता भजनी मंडळाच्या अध्यक्षा प्रमिला जंगम, लता बिऱ्हामणे, अंबिका बिऱ्हामणे, सविता बिऱ्हामणे, सविता बिऱ्हामणे, मालन धुमाळ, वैजयंता दुधाणे, कविता जंगम, छाया सणस, मंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश जंगम, विलास दुधाणे, बाळासाहेब धुमाळ, चंद्रकांत कुरगवडे, अशोक जंगम, हरिभाऊ जंगम, गोपाळ मळेकर, मोहन बदक, दत्ता धुमाळ आदी मान्यवरांसह पंचक्रोशितील नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत महुडे खोऱ्यातील वीर बाजी प्रभू देशपांडे यांचे जन्मगांव असलेल्या शिंद येथील स्वरगंगा महिला भजनी मंडळ, ब्राह्मणघर येथील श्री जननीदेवी सांप्रदायीक भजनी मंडळ तर चिखलावडे येथील श्री भैरवनाथ महिला भजनी मंडळाने अनुक्रमने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)