स्वप्न : एक हजार कोटींच्या व्यवसायाचं!

स्वप्नपूर्तीला तारीख असेल आणि ध्येय पक्‍कं असेल तर ते साकार करता येऊ शकतं. यावर “मॉल मार्ट’च्या दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात यांचा पूर्ण विश्‍वास आहे. “स्वप्न + तारीख = ध्येय’ हे सूत्र समोर ठेवूनच त्यांची आजवरची वाटचाल सुरू आहे. एक हजार कोटी रुपयांच्या व्यावसायिक डोलाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्या “मॉल मार्ट’च्या या 
दोन शिलेदारांबद्दल… 

दिलीप ठाकूर यांच्याबद्दल… 
दिलीप ठाकूर हे मूळचे सोळू गावचे. पण शिक्षण मुंबईत झालं. परिस्थिती बेताची त्यामुळं शालेय शिक्षण पेपर टाकून पूर्ण करावं लागलं. एमएसस्सी ऍग्री करायचं होतं; पण सायन्सला ऍडमिशन घेता आलं नाही. म्हणून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करून ऍग्रिकल्चर संबंधित एक डिप्लोमा त्यांनी केला. त्यानंतर दोन वर्ष फ्लोरिकल्चर कंपनीत जॉब केला. सोळूमध्ये पेस्टिसाइड आणि बियाणे विक्रीचं दुकान सुरू केलं. त्यानंतर “भाजीपाल्याची रोपवाटिका’ ही नवीन संकल्पना पहिल्यांदाच “माऊली हायटेक नर्सरी’च्या माध्यमातून त्यांनी बाजारात आणली. वांगी, मिरची, टोमॅटो यांची रोपं करून ते विकू लागले अन्‌ इथूनच त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सुरू झाला. जुनं घर पाडायला पैसे नसतानाही नवं घर बांधण्याचं स्वप्न पाहून 2004 मध्ये ते पूर्ण केलं. तर 2013 मध्ये मर्सिडिझ घेतली. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास आजही अखंड सुरू आहे. तसेच जे करायचे ते उत्कृष्टच करायचे असे ध्येय बाळगूनच त्यांचा उंच भरारीचा प्रवास कायम सुरू असून या वाटचालीचे श्रेय हे संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व टीमसह विश्‍वास ठेवणाऱ्या असंख्य ग्राहकांशिवाय इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.

संतोष थोरात यांच्याबद्दल… 
संतोष थोरात हे पिंपळगावचे. सोळू गावाला ते शिकायला होते. जीवन शिक्षण मंदिर इथून त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. वडील मुंबईला असायचे. त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. सातवीनंतर ते मुंबईला गेले. दिवसभर पायी फिरून फुलांची विक्री ते करून रात्रशाळेतून दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गिरगावात एक दत्तमंदिर होतं, तिथंच ते राहायचे. त्यानंतर “सेवा मेडिकल लिमिटेड’मध्ये त्यांनी आठ वर्ष नोकरी केली. पण नोकरीत मन रमेना. नोकरी सोडून “साई सागर हॉटेल’ सुरू केलं. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्रांची साथ मिळाली. दरम्यान डेंग्यूमुळं भावाचा मृत्यू पाहण्याचं दुर्देव त्यांच्या वाट्याला आलं. त्यामुळं प्रचंड निराशा आली. त्यातून व्यावसायिक नुकसानही झालं. पण “रडायचं नाही लढायचं’ हा शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्यांनी स्वतःला सावरलं. पुन्हा नवी उमेद घेत व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं. तिथं काम करत असताना त्यांना स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद मिळाली. ही ताकद आज प्रचंड वाढली आहे.

“मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत. ती साकारण्यासाठी धडपड केली पाहिजे. तसंच ती भेटेल त्याला सांगितलीही पाहिजे. लोक तुमच्यावर हसतील.. वेडं म्हणतील.. तेव्हा समजा की तुम्ही योग्य दिशेनं चालत आहात…’

“मॉल मार्ट’चे सर्वेसर्वा दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात त्यांच्या स्वप्नांचा प्रवास सांगत होते. आजवर त्यांनी जे जे स्वप्न पाहिलं ते ते इच्छाशक्तीच्या आधारावर पूर्ण केलं आहे. शहरांच्या धर्तीवर निमशहरी भागातील लोकांनाही मॉल संस्कृतीत खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी ठाकूर आणि थोरात या दोघांनी मिळून 2014 मध्ये आळंदीत “मॉल मार्ट’ सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आता केवळ पुण्याच्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध उपनगरांमध्ये त्यांना “मॉल मार्ट’चं जाळं विणायचं आहे. 2027 पर्यंत मॉल मार्टच्या 50 शाखा उघडण्याचं आणि त्याद्वारे 500 कोटी व कन्स्ट्रक्‍शनमध्ये 500 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचं त्यांनी ध्येय समोर ठेवलं असून हे ध्येय गाठण्यासाठी त्यांची टीम व त्यांचे असंख्य ग्राहक त्यांच्या पाठिशी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात हे दोघंही एकत्र आले. त्यांनी मनं आणि स्वप्न जुळली आणि व्यावसायिक एकीचा प्रवास सुरू झाला. “मॉल मार्ट’च्या इमारतीचं बांधकाम चालू असताना त्यांनी ठरवलं की इथं मॉल सुरू करायचा. त्यासाठी त्यांना “टीजेएसबी’ बॅंकेनं आर्थिक सहकार्य केलं आणि मॉल मार्टचं स्वप्न साकार झालं. हे सगळं उभं करताना आलेल्या अडचणींबद्दल दोघंही एक शब्दही बोलत नाहीत. कारण त्याबद्दल त्यांना फक्त वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलायला आवडतं.

“दिलीप ठाकूर यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोचू शकलो.’, असं संतोष थोरात म्हणतात. ठाकूर यांच्याशी बोलताना ते जाणवतंही. ते म्हणतात, “कोणताही व्यवसाय करताना का करांयचा ते स्पष्ट हवे, कसा करायचं ते आपोआप येतं.

दोघं एकत्र आले तेव्हा हेच व्हाय त्यांनी क्‍लिअर केलं. कारण त्यांच्या मते मूल्य आणि तत्त्वांचा पाया भक्‍कम असेल तरच मोठा व्यवसाय उभा करता येतो. त्यामुळंच “स्वत: पेक्षा कंपनी मोठी पाहिजे’, “गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड करायची नाही’, “व्यवसायात नेहमी अपडेट व अपग्रेड राहिले पाहिजे’, आपल्याबरोबरच आपल्या टीममधील लोकांची सुद्धा स्वप्न पूर्ण करायची’, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करायची’ ही पाच सूत्रे त्यांनी व्यवसाय करताना समोर ठेवली आहेत.

या मुल्यांवरच दहा हजार स्क्वेअरफूटचा “मॉल’ उभा राहिला आहे. मॉल सुरू केल्यानंतर दोघांनीही “माऊली डेव्हलपर्स’च्या माध्यमातून 2015 मध्ये बांधकाम व्यवसायात पदार्पण केलं. “साई समृद्धी’ नावाची 80 फ्लॅटची स्किम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आणखीही काही स्किम त्यांच्या सुरू आहेत. त्यांच्या या दोन्ही व्यवसायाची गेल्या तीन वर्षांत वार्षिक उलाढाल 30 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. 2027 पर्यंत रिटेल्समध्ये 500 कोटी अन्‌ रियल इस्टेटमध्ये 500 कोटी अशी 1000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ही स्वप्नं पूर्ण होणार याबाबत त्यांच्याही मनात कोणतीही शंका नाही. कारण स्वप्नांचा आनंदानं पाठलाग करणं हे दोघांनाही आवडतं. इतकंच नाही तर त्यातच दोघांचं नैसर्गिकपण सामावलं आहे. “यूअर नेचर इज यूअर फ्युचर’ ही त्यांची टॅगलाईन म्हणूनच त्यांच्या स्वप्नांनाही पूरक ठरते.

मॉलमार्टमध्ये किराणा, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी, भेटवस्तू, साड्या, रेडिमेड कपडे, वधू-वरांची कपडे, बस्त्याच्या साड्या आदी वस्तू ग्राहकांना अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांच्या घराची गरजही “माऊली डेव्हलपर्स’च्या माध्यमातून 1, 2 बीएचके फ्लॅटद्वारे पूर्ण केली जाते. आज मानवाच्या प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र व निवारा. या तिनही गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करण्याचे आळंदी भोसरी परिसरातील ग्राहकांच्या पसंती एकमेव ठिकाण म्हणजे “मॉलमार्ट’.

मोलमार्टचं वैशिष्टय

आळंदीत वाढत असलेली फ्लॅट सिस्टिम आणि आळंदीच्या मूळच्या ग्राहकाला डोळ्यासमोर ठेवून केलेली रचना 

सवलतीसह खरेदीचा मनसोक्‍तआनंद 

उत्पादनांची उत्तम गुणवत्ता 

सामाजिक भान जपताना… 
दिलीप ठाकूर आणि संतोष थोरात हे दोघंही शून्यातून इथपर्यंत पोहोचलेले. त्यांच्याप्रमाणंच अनेक गरजू विद्यार्थी समाजात आज आहेत. त्यांच्यापर्यंत थेट मदत पोहोचावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. या भूमिकेतूनच त्यांनी यंदा 1 लाख रुपयांच्या वह्या वाटल्या. 

वॉल मार्ट इथं येतं तर आपण तिथं का नाही जायचं? 
असा प्रश्‍न विचारून दिलीप ठाकूर व्यवसाय करण्यामागची दूरदृष्टी स्पष्ट करतात. व्यवसाय पोहोचण्यासाठी जागतिक पातळीवर मान्यता असणारं नाव हवं, वॉलमार्टच्या धर्तीवर “मॉल मार्ट’ हे नाव भविष्यातलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी जाणीवपूर्वकच ठेवलं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)