स्वत:च्या चुकीने झालेला अपघात नुकसानभरपाईस अपात्र

एखादा गाडीमालक स्वतःच गाडी चालवीत असेल व त्याच्या चुकीने अथवा निष्काळजीपणाने अपघात झाल्यास तो विमा कंपनीकडून नुकसानभरपाईस अपात्र ठरतो. फक्त त्याला मालकाचा असलेल्या मर्यादित विम्याचा लाभ घेता येतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामन्ना व एस. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने मागील आठवड्यात 31 ऑगस्ट 2018 रोजी दिला आहे .

नॅशनल इन्शुरंस कंपनी लि. विरुद्ध आशालता भावनीक व इतर या खटल्यात मोटार अपघात न्यायाधीकरण व उच्च न्यायालय या दोन्हींचा निकाल रद्द करीत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

या खटल्यात दिलीप भावनीक हा मयत स्वतःची गाडी घेऊन कथलताली गावाहून घरी परतत होता. आगरतळा येथील पुलाजवळ बायपास रस्त्यावर आला असताना त्याचा अपघात झाला. दवाखान्यात उपचारानंतर तो मृत पावला. त्याची आई, पत्नी व मुलांच्या वतीने तो व्यावसायिक असल्याने त्याला 15000/- रुपये मासिक उत्पन्न होते. त्यानुसार 68 लाख 15 हजार रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा केला. मोटार अपघात न्यायाधीकरणाने विमा कंपनीला मयताच्या वारसांना 10 लाख 57 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश केला. त्या निर्णयावर नाराज झालेल्या विमा कंपनीने त्रिपुरा उच्च न्यायालयात अपील केले. या अपिलामधे विमा कंपनीने सदर मालक स्वतःच गाडी चालवीत होता, त्यामुळे मोटार वाहन कायदा 1988 नुसार तो थर्ड पार्टी (इतर पक्ष) होऊ शकत नाही असा बचाव केला. उच्च न्यायालयाने तो थर्ड पार्टी होऊ शकत नाही हे मान्य केले. मात्र, संबंधित वाहनमालकाने वैयक्तिक विमा भरला आहे, त्यामुळे तो नुकसानभरपाईस पात्र आहे असे सांगून त्याला नुकसानभरपाई देण्यात यावी, असा आदेश देण्यात आला.

संबंधित विमा कंपनीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर सुनावणी होऊन जर अपघात झालेल्या वाहन मालकाची चुकी असेल तर तो अपघात नुकसानभरपाईस पात्र होणार नाही. तसेच थर्ड पार्टी विम्याचे संरक्षण गाडी मालक-चालकाला घेता येणार नाही, असे स्पष्ट करीत फक्त तो त्या गाडीचा विमा भरीत असताना मालकाचा वैयक्तिक विमा फक्त दोन लाखांचा असल्याने तेवढीच रक्कम मिळवण्यास तो पात्र असेल व त्याच्या वारसांना थर्ड पार्टी विम्याचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले व दोन लाख रुपये व्याजासह त्याच्या वारसाना देण्याचा आदेश झाला.

सुमारे 68 लाख 15 हजारांचा दाखल केलेला क्‍लेम अवघे दोन लाख रुपये नाममात्र मिळाले. सन 2007 च्या ओरीएंटल इन्शुरंस कंपनी विरुद्ध श्रीमती झुमा शहा या खटल्यात देखील सर्वोच्च न्यायालयाने अपघातात दुसरे वाहन सामील नसेल व अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल तर त्याच्या वारसांनी केलेला दावा अपात्र ठरेल असे स्पष्ट केले आहे.

एकूणच जर गाडी स्वतः मालक चालवीत असेल तर आपल्या निष्काळजीपणामुळे इतरांना तर जीव गमवावा लागेलच, मात्र आपला जीव गेल्यास आपल्या वारसांनाही विशेष फायदा होणार नाही याचा विचार करून गाडी शिस्तीत व वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवणेच योग्य आहे हे लक्षात घेतले पाहीजे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)