स्वत:च्या गरजा स्वत: पूर्ण करणे म्हणजे विकास : गायकवाड

भगवान महावीर व्याख्यानमाला पुष्प चौथे
नगर – स्वत:च्या गरजांसाठी इतरत्र न जाता माणूस जेव्हा त्या स्वत:च पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी विकास झाला, असे म्हणता येईल. प्रत्येक व्यक्तीने मी उत्तम काम करेल, मी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल या विचाराने प्रेरीत होऊन प्रत्येक क्षेत्रात काम केल्यास भारत महासत्ता बनेल, असा विश्वास भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केला.
जैन सोशल फेडरेशन आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित भगवान महावीर व्याख्यानमालेत गायकवाड यांनी विकास उद्योगाचा या विषयावर चौथे पुष्प गुंफले. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छायाताई फिरोदिया उपस्थित होत्या.
गायकवाड म्हणाले, तुम्हाला जे येते, जे जमते ते जीव ओतून करा. उत्तम, सर्वोत्तमतेसाठी प्रयत्न करा. उत्तम काम करण्यासाठी जगामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. स्वत:च्या पलीकडे जाऊन जग पाहता आले पाहिजे.
भारत विकास ग्रुप (बीव्हिजी)ची यशोगाथा सांगताना गायकवाड म्हणाले, आयुष्यात काही तरी वेगळे काम करायचे हे मी ठरवले होते. रोज काही तरी चांगले करत जायचे, त्याचे फळ कधी ना कधी मिळतेच. बीव्हिजी ग्रुपमध्ये आज 70 हजार लोक काम करतात. 2000 मध्ये दिल्लीत पार्लमेंटच्या लायब्ररीचे हाऊस किपिंगचे काम मिळाले. त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान येथील काम मिळाले. शेतातील पिकांवर विविध प्रकारच्या कीड, रोग येतात. त्यासाठी संशोधन करून औषध शोधून काढले आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही बीव्हिजी ग्रुप कार्यरत आहे. सातारा येथे मेगा फूड पार्कची उभारणी केली आहे. यात महिलांना रोजगाराच्या संधी आहेत. शेतीमधील प्रक्रिया उद्योगांचा यात समावेश आहे. आपल्या यशाचे मर्म सांगताना गायकवाड म्हणाले, तळागाळातल्या लोकांसाठी मी काम करतो. लोकांची तुम्ही काळजी घेतली तर लोक तुमची काळजी घेतात. यावर माझा विश्वास आहे. लोक मोठ्या माणसांना आदर देतात. जितका माणूस लहान आहे तितका मी त्याला जास्त आदर देतो. तळागाळातल्या माणसाचा मला विकास करायचा आहे. त्यामुळे मी मोठी स्वप्ने पाहतो. जबर इच्छाशक्ती व योग्य नियोजन असेल तरी तुम्हाला यश मिळते. पुढच्या 12 वर्षात 10 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचे ध्येय आहे. लोकांसाठी काम करताना नवी ऊर्जा मिळते, रोज काही तरी नवीन शिकायला मिळते.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सरोज कटारिया यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)