स्वतःच्या मुलीच्या अपहरणाची धमकी

पिंपरी – पतीने पत्नीला आपल्याच मुलीच्या अपहरणाची धमकी देत तिचा छळ केला. ही घटना थेरगाव येथे घडली.
पंकज विठ्ठल सुतार (रा. विघ्नहर्ता कॉलनी, पवार नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.

याबाबत पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर एका वर्षाने आरोपी पती सुतार याने पत्नीकडे सोने आणि पैशाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने त्याने आपल्या पत्नीला त्रास देण्यास सुरवात केली. कौटुंबीक कारणावरून शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच मुलगी स्वरा हिचे अपहरण करण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक महेश स्वामी अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)