स्वतंत्र लिंगायत धर्म मुद्द्यावर अभ्यास करू : केंद्र सरकार

नवी दिल्ली : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याबाबतच्या कर्नाटक सरकारच्या शिफारशीवर केंद्र सरकार विचार करेल. याचा अभ्यास करूनच त्यावर निर्णय घेता येईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देऊन अल्पसंख्य समुदाय म्हणून मान्यता मिळण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या विधानाला प्रतिसाद देतानाचा केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

लिंगायत आणि वीरशैव लिंगायत हे समुदाय बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानाला मानणारे आहेत व त्यामुळे त्यांना विशेष समुदायाचा दर्जा मिळावा असा त्या समितीचा अहवाल नुकताच सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने ही शिफारस करण्याचा निर्णय घेतल्याचे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)